-->

सलमान खानची 1 कोटीची ऑफर नाकारली

पुणे – सलमान खानला कधी काय आवडेल सांगता येणार नाही. सध्या एक घोडा प्रचंड आवडला आहे. मात्र खूप प्रयत्न करूनही तो या घोड्याला मिळवू शकत नाही. “परमवीर’ असे या घोड्याचे नाव आहे. त्याने हा घोडा खरेदी करायचे ठरवले. त्यासाठी घोड्याच्या मालकाशी संपर्कही साधला. 

घोड्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजण्याची तयारी भाईजानने दाखवली. मात्र घोड्याच्या मालकाने सलमानची ही ऑफर सपशेल धुडकावली आणि घोडा विकायला सपशेल नकार दिला. पंजाबच्या फरिदकोट जिल्ह्यात हॉर्स ब्रिडर्स स्पर्धा सुरू आहे.

या स्पर्धेमध्ये अहमदाबादचे रणजीत सिंह राठोड आपल्या घोड्यांना घेऊन आले होते. त्यातच परमवीर नावाचा घोडा आहे. हा घोडा दिसायला तर अगदी उमदा आहेच, पण तो अतिशय ताकदवान आणि वेगात पळणारा आहे.

काळ्या रंगाच्या, 65 इंच उंचीच्या परमवीरच्या रोजच्या खुराकावर 2 हजार रुपये खर्च होतो. हा घोडा बघून सलमान बेहद्द खूष झाला. त्याने या घोड्याला मिळवण्यासाठी आपल्या माणसांना पाठवले. पण राठोड यांनी त्यांना परत पाठवले.

सलमानने 1 कोटी रुपये द्यायची तयारी दाखवली तरी मालक तयार झालेले नाहीत. अजूनही सलमानने आपली आशा सोडलेली नाही आणि तो राठोड यांना मनवण्याचा प्रयत्न करतो आहे, असे समजते आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.