दिया मिर्झाचा शाही विवाह सोहळा, पाहा फोटो…

मुंबई – दिया मिर्झा आणि बिजनेसमन वैभव रेखी यांचा विवाह नुकताच धुमधडाक्‍यात पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. लाल साडीमध्ये दिया मिर्झा खूपच क्‍युट दिसत होती. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

हा विवाह सोहळा खूपच कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. दोन्ही बाजूचे मिळून केवळ 50 जण विवाहाला उपस्थित होते, असे समजते आहे. या पाहुण्यांची यादी आगोदरच निश्‍चित केली गेली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

अर्थात यामध्ये मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर देखील होता. गेल्या वर्षी करोनाच्या लॉकडाऊनच्या काळातच दिया आणि वैभव यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

वैभव रेखी हा प्रख्यात योगा इन्स्ट्रक्‍टर सुनैना रेखीचा पती होता. त्यांच्यात घटस्फोट होऊन गेला आहे आणि त्यांना एका मुलगी देखील आहे. तर दिया मिर्झानेही 2014 साली बॉयफ्रेंड साहिल संघाबरोबर लग्न केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

हे लग्न दिल्लीत आर्य समाजाच्या रिती रिवाजानुसार झाले होते. 6 वर्षे एकत्र राहिल्यावर 2019 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. दियाने यापूर्वी “रहना है तेरे दिलमें’, “तुमको ना भुल पायेंगे’,”दम’,”दस’,”लगे रहो मुन्नाभाई’ आणि “संजू’मध्ये काम केले आहे. सर्वात शेवटी तिने “थप्पड’मध्ये काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.