संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरिष बापट

खासदार विनायक राऊत आणि सुनिल तटकरे समितीचे सदस्य

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – खासदार गिरीष बापट यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून खासदार विनायक राऊत आणि सुनिल तटकरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 30 सदस्यीय अंदाज समितीची स्थापना केली आहे. ही समिती 24 जुलै 2018 ते 30 एप्रिल 2020 या कालाधिसाठी नियुक्त करण्यात आली आहे. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळोवेळी या समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या उप समित्या, गट स्थापन करण्यात येईल.

या समितीसमोर येणाऱ्या विषयांचे सखोल परिक्षण किंवा अभ्यास करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने समितीचे पूर्ण सदस्य किंवा निवडक सदस्य प्रत्यक्ष प्रकल्प किंवा आस्थापनेला भेट देवू शकतात. या भेटीपूर्वीच संबंधीत आस्थापना किंवा संस्थेचा आगावू कार्य अहवाल ही समिती मागवते. या संदर्भातील संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येते व यातील माहिती प्रसिध्दी माध्यमांना न देण्याचा दंडक पाळला जातो.

या समितीच्यावतीने लोकसभेत मांडण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित मंत्रालय किंवा विभागाने सहा महिन्याच्या आत कार्यवाही करणे गरजेचे असते. अहवालावरील उत्तराचे समिती परिक्षण करते आणि त्यानंतर कृतीआराखडा लोकसभेत मांडला जातो यातील सूचनांचा सभागृहातील कामकाजात नोंद होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.