मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने काही दिवसांपूर्वीच त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्याने पनवेल येथील फार्महाऊसवर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यातल्या एका फोटोमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. सलमानच्या एका हॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती सलमानची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. पण आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हॉलिवूड अभिनेत्री समांथा लॉकवूड सध्या भारतात आहे. तिला दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर तिने सलमान खानच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. तिचे सलमानसोबतचे फोटो पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्रीने त्यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
‘मला असे वाटतय लोक याविषयी बोलत आहेत. पण याविषयी बोलण्यासारखे काही नाही. मी सलमानला भेटले आणि तो खरच खूप चांगला मुलगा आहे. इतकच त्याच्या विषयी बोलण्यासारखे आहे. पण या अफवा कशा सुरु झाल्या हे मला कळाले नाही.
मी सलमानला भेटण्यापूर्वी हृतिक रोशला भेटले. हृतिक आणि माझ्याविषयी कोणी काही बोलले नाही. पण या सर्व अफवा आहेत’ असे समांथा एका मुलाखतीमध्ये म्हणाली.