दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या आगामी “आचार्य’ या चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, जे ऐकून चाहते अधिक उत्साही होतील. रिपोर्टसनुसार, बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात सलमान खान एक खास कॅमिओ भूमिका साकारणार असल्याचे सागंण्यात येत आहे. “आचार्य’ हा चित्रपट मल्याळममधील सुपरहिट “ल्युसिफर’ चित्रपटाचा रिमेक असेल. “ल्युसिफर’मध्ये पृथ्वीराजांनी जी भूमिका साकारली होती, तिच भूमिका सलमानने साकारावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. मात्र, सलमानने अद्याप या भूमिकेसाठी आपली सहमती दिली नाही. चिरंजीवीची मुख्य भूमिका असलेल्या “आचार्य’ला सुजित हे दिग्दर्शित करणार आहेत. यात चिरंजीवीसोबत काजल अग्रवाल मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, सलमानचा “राधे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून लॉकडाऊनमुळे ते रखडलेले आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हूड्डा आणि सलमान खानच्या विरोधात जॅकी श्रॉफ दिसणार आहेत. हा चित्रपट ईदनिमित्त रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे आता तो कधी प्रदर्शित होणार आहे, ते पाहावे लागेल.