मुंबई – जूनच्या सुरुवातीला सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. धमकी मिळाल्यानंतर अभिनेत्याने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. सलमानने बंदूक परवान्यासाठी अर्ज केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, पंजाबमधील मानसा येथे 29 मे रोजी गोळ्या घालून ठार झालेल्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनी सलमानला ही धमकी मिळाली होती.
सलमान खान काल मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला आणि त्याने पोलिस अधिकारी विवेक फणसाळकर यांची बंदूक परवान्यासाठी भेट घेतली. सलमान खानला त्याच्या सुरक्षिततेसाठी तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी बंदूक हवी आहे.
सलमान खान पोलिस मुख्यालयात पोहोचला?
सलमान खान फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी पोलीस मुख्यालयातील परवाना प्राधिकरणाकडे पोहोचला होता. सिद्धू मुसेवालाला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या माणसांनी गोळ्या घालून ठार मारल्यानंतर, जूनच्या सुरुवातीला सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले.
प्रेक्षक सलमानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत
सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षक त्याच्या ‘टायगर 3’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये तो कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ‘कभी ईद कभी दिवाली ‘ ‘मुळेही तो चर्चेत आहे.