Salman Khan – बॉलिवूडचा सुलतान म्हणजेच सलमान खान त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानचा ५३ वा वाढदिवस साजरा करताना दिसतात. यादरम्यान सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पापाराझींना पाहून भाईजान चांगलाच चिडलेला दिसत आहे.
View this post on Instagram
सोहेल खानने 19 डिसेंबरला त्याचा 53 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचा भाऊ सलमान खानसह त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ज्यामध्ये सलीम खान, हेलन, सलमा खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा, अलविरा खान, अतुल अग्निहोत्री आणि त्यांची मुलगी अलिझेह अग्निहोत्री आणि जवळचे मित्र होते.
वाढदिवसाच्या पार्टीनंतर, ‘बजरंगी भाईजान’ अभिनेता त्याच्या पालकांसह कार्यक्रमस्थळ सोडताना दिसला. सलमानला पाहताच अनेक फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी त्याच्या कारजवळ आले. हे पाहून सलमान खान संतापला आणि कारमध्ये बसण्यापूर्वी तो पॅप्सकडे डोळे मिचकावत रागाने पाहू लागला यावेळी ‘सगळे मागे हटले’ सलमान खानला पॅप्सवर राग आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी सलमानचे समर्थन केले आहे आणि म्हटले आहे की पॅप्सने स्टार्सला इतका त्रास देऊ नये.
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलताना, सलमान खान सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘टायगर 3’ च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले होते आणि आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली होती.