मुंबई – बॉलीवूड दबंग स्टार सलमान खानच्या “अंतिम – द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा गॅंगस्टारच्या भूमिकेत तर सलमान खान पोलिसांच्या भूमिकेत दिसून आले. या चित्रपटातील सलमान आणि आयुष यांच्यातील फाईट सीन चांगलाच चर्चेत आला होता.
आता पुन्हा एकदा हे दोघे ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयुष कधी ईद कभी दिवाळी चित्रपटा दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेनुसार सलमान च्या भावाचा रोल आयुषला मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांवर सलमानने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
या चित्रपटामध्ये आयुष सोबतच अभिनेता झहीर इक्बाल याचाही नावाची चर्चा आहे. कभी ईद कभी दिवाळी च्या चित्रपटाचे फरहाद सामजी दिग्दर्शन करत आहे.
हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांसाठी हा दुहेरी उत्सव असेल कारण हा चित्रपट सलमान खानच्या वाढदिवसाच्या तीन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.