उबदार कपड्यांच्या विक्रीत तीस टक्‍क्‍यांनी घट

थंडीचे प्रमाण कमी असल्याचा परिणाम


फॅन्सी जॅकेटची क्रेझ

पिंपरी – दरवर्षी ऑक्‍टोबर महिना संपल्यानंतर शहरात थंडीची चाहुल लागते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यातही पाऊस कोसळत होता. त्यामुळे, उशीराने म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडीची चाहुल लागली. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागामध्ये शहरातील व्यापाऱ्यांबरोबरच हिमाचल प्रदेश, तिबेट मधील व्यापारी उबदार कपडे विकण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, अद्यापही थंडी जाणवत नसल्यामुळे उबदार कपड्यांचा व्यापार मंद गतीने सुरु आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्‍क्‍यांनी व्यापारात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागातील पदपथांवर सध्या आकर्षक डिझाईन आणि वेगवेळ्या रंगातील उबदार कपड्यांची रेलचेल पहायला मिळत आहे. थंडीपासून संरक्षण करण्याबरोबरच नवनवीन फॅशनेबल कपडे सध्या विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. तरुणांसाठी सुपर ड्राय, रिदम, विंटर जॅकेट, चेक्‍स स्वेटर, पॉकेट स्वेटर, दुचाकी चालवताना वापरले जाणारे स्वेटर, इत्यादी प्रकरचे उबदार कपडे उपलब्ध आहेत. यामधील काळ्या, पांढरी व खाकी रंगातील उबदार कपडे तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत.

स्वेटर जॅकेट बरोबरच महिलांसाठी नक्षीकाम केलेल्या शाल, हातमोजे, मफलर, कानटोपी, कानपट्टी, सॉक्‍ससह कतरिना, पलक, हिल्स, कॉलर लेडिज स्वेटर, व्ही नेक या कपड्यांना चांगली मागणी आहे. तर लहान मुलांसाठी अपना टाईम आयेंगा, बरोबरच चायनिज स्वेटरही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. नविन फॅशनेबल उबदार कपडे मात्र तरुणांचे लक्ष वेधून घेत असले तरी आता डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही अपेक्षीत थंडी जाणवत नसल्यामुळे सध्या तरी उबदार कपड्यांच्या विक्रीला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)