बेल्हे-शहरातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याने साकोरी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीने दखल घेतली आहे. गावामध्ये पुणे-मुंबई किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला प्रवेशबंदी केली आहे.
गावातील सर्व मंदिरांना कुलूप लावून प्रवेश बंद केला आहे. किराणा घेण्यासाठी दुचाकीवरून फक्त एका व्यक्तीलाच गावाने परवानगी दिली आहे. गावातील सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले असून गावात लाउडस्पीकर लावून नागरिकांना करोनाबाबतची माहिती दिली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने लाउडस्पीकर लावून गावामध्ये गाडी फिरून आरोग्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती साकोरी गावचे सरपंच पांडुरंग साळवे यांनी दिली. ग्रामपंचायतीमार्फत गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.