Rinku Rajguru – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आर्चीची भूमिका वठवून रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ सध्या तिच्या लग्नाच्या मुद्यावरून चांगलीच चर्चेत आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला आहे.
गेल्या काही काळापासून रिंकू सोशल मीडिया सक्रिय आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. सध्या एका चाहत्याला अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतंच रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशन ठेवलं होतं. याद्वारे तिनं चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिनं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्यानं तिला ‘लग्न करुच नकोस’ असा सल्ला दिला. यावर रिंकूनेही ‘डन’ असं उत्तर दिलं आहे. तिच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या उत्तरानंतर ती कधीच लग्न करणार नाही का असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. तिला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता रिंकूने या सर्व प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना मस्करीत दिली असावी ती भविष्यात लग्न करणार असेल अशी चर्चा सोशलवर सुरू आहे.
दरम्यान, रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, २०१६ मध्ये तिने ‘सैराट’ मधून डेब्यू केलं. या चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या तिचा चाहतावर्ग तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे