मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या आगामी ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सैफ अली खानचा फनी लुक पाहायला मिळतोय.
Trailer drops on 9 Jan 2020… New poster of #JawaaniJaaneman… Stars #SaifAliKhan, #AlayaF, #Tabu and #KubbraSait… Directed by Nitin Kakkar… Produced by Jackky Bhagnani, Deepshikha Deshmukh, Saif Ali Khan and Jay Shewakramani… 31 Jan 2020 release. pic.twitter.com/BgGJ1077KM
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2020
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत या ‘जवानी जानेमन’चं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरसोबतच त्यांनी ‘जवानी जानेमन’च्या ट्रेलरची तारीखही सांगितली आहे. तरण आदर्श यांनी येत्या ९ जानेवारी २०२० ला ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं ट्विट केलंय.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैफ अली खान आणि आलिया फर्नीचरवाला दिसतेय. आलिया जमिनीवर बसली असून तिच्या हातात टेबल फॅन आहे. तर सैफ बाथरोबमध्ये सोफ्यावर पोज देताना दिसतोय.
View this post on Instagram
Introducing #AlayaF… New poster of #JawaaniJaaneman… Directed by Nitin Kakkar… 31 Jan 2020 release.
दरम्यान, हा सिनेमा 31 जानेवारीला रिलीज होनार आहे. नितीन कक्कर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच सिनेमा असणार आहे. याशिवाय पूजा बेदीची कन्या अलाइया फर्निचरवाला ही देखील या सिनेमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.
सैफ आणि अलाइया हे दोघेजण सिनेमामध्ये बाप-लेकीच्या रोलमध्ये दिसणार आहेत. तब्बूचा रोल विशेष महत्वाचा असणार आहे. सैफ अली खानच्याच “ब्लॅक नाईट फिल्म्स’द्वारे “जवानी जानेमन’ची निर्मिती केली गेली आहे.