तेहरान – इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमानात १८० प्रवासी आणि क्रू मेंबर होते. हा अपघात इमाम खोमैनी विमानतळाजवळ झाला असल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
वृत्तानुसार, युक्रेनच्या बोईंग ७३७ विमानात १८० प्रवासी होते. तेहरान इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे समजू शकले नाही.
Iranian state TV reports Ukrainian airplane carrying 180 passengers and crew has crashed near airport in capital, Tehran: AP pic.twitter.com/yipppmpRHD
— ANI (@ANI) January 8, 2020
दरम्यान, इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने इराकमध्ये असलेल्या अमेरिकन लष्कराच्या दोन हवाई तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. या हल्ल्याला अमेरिकेनेही दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आले आहे.