भोर- भोर तालुका पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या आंबवडे, भोंगवली, जोगवडी, नसरापुर व नेरे या पांच प्राथमिक आरोग्य केंद्रातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गांवपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य रक्षक किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी दिली आहे.
या किटमध्ये मास्क, गाऊन, ग्लोव्हज, गॉगल, शूकव्हर आदी साहित्यांचा समावेश आहे. या किटचे वाटप भोर तालुका पंचायत समितीचे उप सभापती दमयंती जाधव, गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व सर्व सदस्यांचे उपस्थित एक-दोन दिवसांत वाटप करण्यात येणार असल्याचे सभापती किंद्रे यांनी सांगितले.