hollywood News : सदगुरु जग्गी वासुदेव यांना सर्वच ओळखतात. त्यांनी सर्व स्टार कलाकारांची यापूर्वी मुलाखत घेतली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे, अशात सद्गुरु जग्गी वासुदेव हॉलीवुड एंट्री करणार आहे.
लवकरच सद्गुरु जग्गी वासुदेव हॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे, ते हॉलीवुडची पॉपुलर स्टार जेनिफर लोपेज सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.‘दिस इज मी नॉव: अ लवस्टोरी’ या चित्रपटात त्यांची भूमिका नवीन अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
जेनिफर लोपेजने तिच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. यामध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांची झलक बघायला मिळत नाहीये मात्र, या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये त्यांच्या नावाच्या उल्लेख आहे. यावरून अंदाज लावण्यात येत आहे की या चित्रपटात नक्कीच ते दिसणार आहे.
सोशल मीडियावर पोस्टमध्ये जेनिफर लोपेजने लिहिले आहे की,’मी यापूर्वी कधीही स्वःताला नर्वस, एक्साइटेड आणि घाबरलेले नाही बघितले. हा चित्रपट आठवणीत ठेवणाऱ्यापैकी आहे. ‘दिस इज मी’ हा चित्रपट १५ फेब्रुवारीला प्राइम वीडियोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माझा आता पर्यंतचा सर्वात पर्सनल प्रोजेक्ट आहे.
हा चित्रपट मायथोलॉजिकल स्टोरीटेलिंग आणि पर्सनल हीलिंग आधारित आहे. या चित्रपटात दोन प्रेम करणाऱ्या जोडप्याची कथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटातील स्टार कास्टबाबत सांगायचे झाल्यास, जेनिफर लोपेज आणि सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या शिवाय बेन अफ्लेक, ट्रेवर नोआह, सोफिया वेरगारा, कीकी पाल्मर, नील दी ग्रेस टाइसन आणि पोस्ट मलोनी सुद्धा दिसणार आहे.