श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आणि मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने स्थापित झालेली एकदिवसीय शंकरगीता पारायण समिती संपूर्ण महराष्टात घरो घरी जाऊन निशुल्क पद्धतीने श्री सद्गुरू शंकर बाबांच्या पोथीचे एकदिवसीय पारायण सेवा करत आहे.
यंदाचे चौथे वर्ष समितीचे सुरू आहे ,सद्गुरू शंकर बाबांच्या भक्त परिवाराच्या घरी जणू एक दिवसाचा उत्सवच साजरा होत असतो आणि ही निशुल्क सेवा पाहून पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार श्री गणेश उर्फ अप्पा लांजेकर यांनी स्वतः घडवलेली शंकर बाबांची मूर्ती पारायण समितीला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचे औचित्य साधून ही शंकर बाबांची मूर्ती पारायण समितीच्या हाती समर्पित केली.
अप्पा लांजेकर यांनी सांगितले की घरो घरी पारायण समितीची सेवा होत असताना सद्गुरू शंकर बाबांची मूर्ती देखील भक्तांच्या घरोघरी जाईल आणि एक दिवसीय पारायण भक्त परिवारात घडताना तिथे येणाऱ्या सर्व भक्त परिवारास बाबांच्या दर्शनाचे भाग्य देखील लाभेल.
दादा ठोंबरे यांनी सांगितले की श्री सद्गुरू शंकर बाबांचे विधिवत कलश स्थापन करून,प्राणप्रतिष्ठा करून शंकर बाबांची महिमा घरोघरी या एक दिवसीय पारायण सेवेतून कळावी आणि भक्त परिवाराला आपल्या भक्तीचा आणि सद्गुरुंच्या कृपाशीर्वादाचा लाभ मिळावा हाच एक उद्देश आमच्या समितीचा आहे.
आज सद्गुरू शंकर बाबांच्या मठात संस्थेचे विश्वस्त आणि मठातील गुरुजींनी शंकर बाबांच्या मूर्तीचे विधिवत पुजन करून ही मूर्ती अप्पा लांजेकर यांच्या हस्ते समितीच्या हाती सुपूर्त केली त्या नंतर स्वामी समर्थांचे नामस्मरण करत पारायण समितीच्या सेवेकर्यांनी पायी चालत शंकर बाबांच्या मूर्तीस बालाजी नगर येथे उषा वाणी यांच्या घरी नेली आणि तिथे देखील शंकर बाबांचे स्वागत नामस्मरण, आरती, भजन अश्या भक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा फार छान पद्धतीने संपन्न झाला.
सद्गुरू शंकर बाबांचे भक्त आणि शंकर बाबांच्या मठातील माजी विश्वस्त कन्हैया रतन दुबे आणि सप्तश्रृंगी महिला भजनी मंडळाच्या संचालीका उषा प्रकाश वाणी या सर्व सेवेकर्यांचा माध्यमातून ही सेवा सलग 4 वर्ष अखंड महाराष्टात सुरू आहे. ज्या भक्तांना आपल्या घरी हे एक दिवसीय पारायण करू वाटत असेल तर नक्की आम्हास कळवावे ही विनंती कन्हैया रतन दुबे आणि उषा वाणी यांनी सर्व भक्तास केली.