नवी दिल्ली – प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेला सचिन तेंडुलकरने नुकतंच एक ट्विट केलं आहे. सचिनच्या या ट्विटने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.कारण सचिनच्या या ट्विटवरून तो एका खेळाडूवर प्रभावित झाल्याचे समजते. सचिनला आवडणारी प्रत्येक गोष्ट तो आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत असतो.
सचिनने केलेले ट्विट एका खेळाडूबाबत आहे. आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध झालेल्या सनरायझर्स हैदराबाद या मॅचमध्ये हेनरिक क्लासेनने दमदार फटकेबाजी केली. अतिशय सोप्या शब्दात सचिनने या खेळाडूच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे.
सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, हेनरिक क्लासेन हा इतर परदेशी फलंदाजांपेक्षा वेगळा आहे ज्याने अनेकदा आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवले आहे. तेंडुलकर पुढे म्हणाला की, आयपीएल ही क्रिएटिव्ह आणि पारंपारिक फलंदाजीचे मिश्रण आहे. आज क्लासने क्लासिक पारंपारिक फलंदाजीचे प्रदर्शन केले.क्लासेनचे फूटवर्क कमालीचे होते, ही त्याच्या अलीकडच्या काळात पाहिलेल्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे. जे पाहून आनंद झाला. असंही सचिन म्हणतो.
IPL is a mix of creative and traditional batting. Today has been a Klaas-ic display of traditional batting. Klaasen’s footwork has been simple and uncomplicated, one of the best I’ve seen in the recent past.
Treat to watch!#SRHvRCB #IPL2023 pic.twitter.com/mUVRTRxsYh— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 18, 2023
या मॅचमध्ये हेनरिक क्लासेन 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 104 धावा काढून बाद झाला. यावेळी क्लासेनने स्पिनर्स विरुद्ध अक्षरशः रन्सचा पाऊस पाडला आणि टीमसाठी सर्वात वेगवान शतक ठोकले. सचिन सोबत या खेळाडूचे ए बी डिव्हिलियर्सने देखील कौतुक केले.