नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनेच्या (सार्क) सदस्य देशांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला पाकिस्तान वगळता सर्वच देशांनी पाठिंबा दिला आहे. कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक मजबूत आणि संयुक्त रणनीती बनवायला हवी. आपल्या देशाच्या नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करुन जगाला एक संदेश देता येईल, असे मोदींनी म्हटले होते.
Thank you dear Prime Minister Modiji @PMOIndia for wishing me successful surgery and speedy recovery. It was thoughtful of you to express such warm words, reflecting our close friendship.
— K P Sharma Oli (@kpsharmaoli) March 2, 2020
पंतप्रधान मोदींच्या या सूचनेचे पाकिस्तान वगळता बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तानने स्वागत केले आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी याविषयी एक ट्विट केले आहे. आमचे सरकार सार्कच्या सदस्य देशांबरोबर कोरोनावर काम करण्यासाठी तयार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेचे स्वागत करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Thank you for the great initiative Shri @narendramodi – #LKA is ready to join the discussion & share our learnings & best practices and to learn from other #SAARC members. Let’s unite in solidarity during these trying times and keep our citizens safe. https://t.co/fAiT5w3O8D
— Gotabaya Rajapaksa (@GotabayaR) March 13, 2020
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, त्यांचा देश कोरोनाविरोधातील लढाईत संयुक्त चर्चेस तयार आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. श्रीलंका चर्चा करण्यास आपले अनुभव सांगण्यास आणि सार्कच्या सदस्य देशांपासून शिकण्यास तयार आहे. आपल्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायला हवे. त्याचबरोबर भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनीही कोरोनाविरोधातील लढाईसाठी आपल्या सहभागाला मान्यता दिली आहे.