मुंबई – मांडवा बंदरावर एक प्रवासी बोट बुडाली आहे. आज सकाळी १०.३०च्या सुमारास ही घटना घडली. बोटीमध्ये ८८ प्रवासी प्रवास करत होते. बोटीतील सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे.
Maharashtra: A ferry boat capsizes near Mandawa in Alibaug; All passengers rescued safely. https://t.co/h8ob8foI3w pic.twitter.com/tuRuTkHhbV
— ANI (@ANI) March 14, 2020
अजंठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट बुडाली आहे. मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोटीत पाणी शिरल्याने प्रवासी घाबरले. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८० प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.
दरम्यान, बोटीचा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे. तर अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करणार आहेत.