सातारा (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी दोन्ही नेत्यांनी निवेदन स्वीकारुन सकारात्मक चर्चा केली. यावेळी परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, विठ्ठल हेंद्रे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर उपस्थित होते.