रेडा -करोनाच्या काळात काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे व इतर नियम न पाळता इंदापूर शहराती वाईन शॉप बेकायदेशीर दारू विक्री करत असून, या वाईन शॉपची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऍड. नारायण ढावरे व आरपीआयचे बारामती लोकसभा मतदार संघ कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी केली आहे.
याबाबत रविवारी (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले असून त्याची प्रत इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांच्याकडे ही दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दारू विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र, इंदापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, टेंभूर्णी, माळशिरस, व इतर तालुक्यातून व अहमदनगर जिल्ह्यातून शेकडो जण दारू खरेदी करण्यासाठी येत आहेत.
यावेळी शासकीय नियमांची पायामल्ली होत असून दारू खरेदी करणाऱ्यांकडे दारू पिण्याचा परवाना नाही. तर विक्रेत्याकडून माल खरेदी केल्याची कोणतेही पावती दिली जात नसल्याचे निवेदना नमूद केले आहे.