निमगावच्या श्री वसंतराव फराटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रा. मनोज वाबळे यांचे मार्गदर्शन
मांडवगण फराटा- एनएसएस शिबिरातून ग्रामीण जीवन उमगेल, असे प्रतिपादन प्रा. मनोज वाबळे यांनी केले.
इनामगाव (ता. शिरूर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य, महाविद्यालय व लोकनेते श्री दादा पाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने सक्षम युवा, सक्षम भारत, उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्काराचा प्रारंभ झाला, यावेळी ते बोलत होते.
उपक्रमामध्ये महिला जनजागृती, रस्ता दुरुस्ती, मूल्यशिक्षण आणि संस्कार, पर्यावरण जागृती राबविण्यात येणार आहेत. प्रा. मनोज वाबळे यांचे “ध्यास स्वप्नांचा, प्रवास यशाचा’ यावर व्याख्यान झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधून आपला देश व स्वतःचे भविष्य उज्ज्वल बनवावे. खरा भारत देश हा ग्रामीण भागात वसलेला आहे.
तेथील जनजीवनाचा अभ्यास करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनातील अनेक पैलू समजू शकतात.शिबिराला प्राचार्य हेमंत कांबळे यांनी भेट देऊन रासेयोच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कामांची पाहणी करून विशेष कौतुक केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार, प्रा. अविनाश ढोबळे, प्रा. सुरेखा देशमुख, प्रा. प्रवीण कुरुमकर, प्रा. विशाल कोपनर, प्रा. रमेश शितोळे, प्रा. दत्तात्रय पवार, प्रा. शीतल क्षीरसागर, प्रा. सोनाली टोगे उपस्थित होते. प्रा. विशाल कोपनर यांनी आभार मानले.