मेष : सुवार्ता कळेल
तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. पैशांची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे कामे करता येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरकामात बराच वेळ दवडावा लागेल. सुवार्ता कळेल. तब्येतीवरचा ताण कमी होईल.
वृषभ : ग्रह अनुकूल
महत्त्वाचे ग्रह अनुकूल असल्याने कोणतेही निर्णय घेताना तडफेने घ्याल. आर्थिक प्रश्न सुटतील. व्यवसायात अशक्यप्राय कामातही यश मिळवाल. वेळेचा व पैशाचा उपयोग योग्य कारणासाठी होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांचेकडून तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. न चिडता कामे करत रहा. कामातील बेत गुप्त ठेवा. महिलांना नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल, खर्च वाढेल.
मिथुन : व्यवसायात नवीन दिशा
व्यवसायात नवीन दिशा सापडेल. कामाचा विस्तार करण्याचे बेत मनात घोळतील. नवीन कामे हाती घेताना त्याचा ताळेबंद करून मगच पुढे जा. आर्थिक येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. कामात अतिविश्वास घातक ठरेल. महिलांना मनःस्वास्थ्य जपता येईल. प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल
कर्क : पैशाची स्थिती समाधानकारक
“दाम करी काम’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत आमिष दाखवून सहकाऱ्यांकडून खुशीने कामं करून घ्याल. कामाचा ताण वाढेल. प्रवास घडेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
सिंह : आत्मविश्वास वाढेल
“खाईन तर तुपाशी…’ असा बाणा राहील. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने मनातील बेत साकार होतील. व्यवसायात कामांना वेग येईल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. बॅंका-हितचिंतकांची मदत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करून घ्याल. सहकारीही कामात मदत करतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कन्या : स्वप्ने साकार होतील
ग्रहांची मर्जी राहील. कामात वाढ होईल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा आता होईल. स्वप्ने साकार होतील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळल्याने तुमची पत वाढेल. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. घरात महिलांचा मूड जरा वेगळाच असेल. विश्रांती घेण्याकडे कल राहील.
तुळ : विशाल दृष्टिकोन असेल
रेंगाळलेली व अर्धवट राहिलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. तुमचा दृष्टिकोन विशाल असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. घरात खर्च वाढला तरी आवश्यक गोष्टींसाठीच असेल. महिलांना मनोजागती खरेदी करता येईल.
वृश्चिक : पैशांची चिंता मिटेल
अत्यंत धोरणी राहून भविष्याची तरतूद कराल. व्यवसायात आवश्यक ते बदल करून यश मिळवाल. पैशांची चिंता मिटेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे करू शकाल. नोकरीत इतरांचे सहकार्य कसे मिळवता, यावर तुमच्या कामाचा ताण अवलंबून राहील. “शब्द हे शस्त्र आहे’, हे लक्षात ठेवा. महिलांनी कामात सतर्क राहावे.
धनु : अनपेक्षित लाभाची शक्यता
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे कराल. व्यवसायात, कामात चोखंदळ राहाल. नवीन कामे हाती घेऊन झपाट्याने पूर्ण करण्याचा मानस असेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. कामाचा विस्तार करण्याचा बेत सफल होईल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. अनपेक्षित लाभाची शक्यता. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग करा.
मकर : कामाचे समाधान
व्यवसायात कामाचा ताण वाढला तरी कामाचे समाधान मिळेल. त्यामुळे त्रास जाणवणार नाही. दिलेला शब्द पाळण्यासाठी अथक परीश्रम घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागल्याने चिडचिड होईल. सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेलच, हे गृहीत धरू नका. मानले तर समाधान, असा बाणा ठेवा. महिलांना कामामुळे दगदग होईल. विश्रांती घ्यावीशी वाटेल.
कुंभ : सर्व क्षेत्रात लाभ
तडजोडीचे व लवचिक धोरण ठेवलेत तर सर्व क्षेत्रात लाभ होईल. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल कराल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. अर्थप्राप्तीचे प्रमाण वाढल्याने पैशाची चिंता मिटेल. वादविवाद टाळून कामे हातावेगळी करण्याकडे कल राहील. महिलांना कामाचा हुरूप येईल. नवीन शिकण्यासाठी तत्पर असाल. चांगली बातमी मन सुखावेल.
मीन : सुसंगती लाभेल
“प्रयत्ने वाळूचे…’ हे लक्षात ठेवावे. व्यवसायात, कामात कोणतीही कसूर ठेवू नये. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. सहकाऱ्यांकडून खुबीने कामं करून घ्यावीत. नोकरीत वादविवाद टाळून कामे उरकावीत. सुसंगती लाभेल. वरिष्ठ कामानिमित्ताने सवलती व अधिकार देतील. वेळेचे महत्त्व पाळावे. महिलांनी सहनशीलता बाळगून कामे करावीत.