स्वच्छता अभियानातून पालिकाच मालामाल

दंडात्मक कारवाईतून दीड कोटी रुपये महसूल

पुणे – शहर अस्वच्छतेबाबतच्या दंडात्मक कारवाईतून महापालिकेला सुमारे दीड कोटी रुपये महसूल मिळाला असून, याविषयात अधिक कडकपणे कारवाई केल्यास पाश्‍चात्य देशांप्रमाणे महापालिकेला हा उत्पन्नाचा नवा स्रोत होऊ शकतो.

स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत महापालिकेने सहभाग घेतल्याने स्वच्छतेसंबंधी उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे-जाळणे, उघड्यावर मूत्रविसर्जन, शौचास बसणे, कचरा प्रकल्प नसणे आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जात आहे. या अंतर्गत गेल्या वर्षभरात प्रशासनाने तब्बल 47 हजार जणांवर कारवाई करून दीड कोटी रुपये वसूल केल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या घनकचरा विभागासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहरातील मोठ्या सोसायट्या, मोठ्या आस्थापना आणि शंभर किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्यांनी आपल्याच परिसरात ओला आणि सुका कचरा जिरवण्यावषयी महापालिकेने आवाहन केले होते.

यासाठी महापालिकेच्या वतीने प्रकल्प उभे करण्यासाठी आणि बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी अवधी देऊन जनजागृती केली होती. ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरवणाऱ्या विविध कंपन्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. नोटीस देऊनही प्रकल्प सुरू न करणाऱ्या सोसायट्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यातूनही तब्बल 5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.