खडकवासला – कोल्हेवाडी खडकवासला किरकटवाडी शिवरस्त्याच्या प्रलंबित समस्यांविषयी आज पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समवेत पुणे महानगर पालिकेत भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी खालील प्रमुख समस्यांवरती तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिवरस्ता दुरुस्त करणे, सिंहगड रस्त्यावरील सीसीटिव्ही व पथदिवे दुरुस्त करणे,अनधिकृत नळ कनेक्शन काढून टाकणे, सोसायट्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावणे, वॉटर फिल्टर प्लांट उभारणे खडकवासला धरण चौपाटी वरील हातगाडी धारकांची पर्यायी व्यवस्था करून त्यांना अधिकृत परवाने देणे.
यावेळी माजी नगरसेवक बाबा धुमाळ, समता परिषद कार्याध्यक्ष सागर कोल्हे, व्यापार संघटनेचे अध्यक्ष सतोष हरकळ,बसवराज जुळके, पुणे शहर कार्याध्यक्ष तनविर शेख, लॉरेन्स हार्जी, संतोष बोराटे, अमोल साळुंखे, काजल केदारी, विनोद माने, बाबू भोसले, देवलेश साळूखे तसे पाणी पुरवठा, लाईट विभाग, रस्ते विभाग, अतिक्रमण विभाग व आरोग्य विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.