-->

आदित्य नारायण आणि नेहा कक्कडच्या लग्नाची अफवाच

मुंबई : गायिका नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून चालली आहे. नेहाने प्रथमच याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य आपला सर्वात जवळचा मित्र आहे.

त्याचे हृदय अगदी सोन्यासारखे आहे. तो याच वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडशी विवाहबद्ध होणार आहे. आदित्य बऱ्याच दिवसांपासून त्याच्या एका गर्लफ्रेंडबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे.

त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी मी त्याला भरपूर शुभेच्छा देते. असेही नेहाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी “इंडियन आयडल’च्या सेटवरच नेहा आणि आदित्यच्या विवाहाचे एक नाटक केले गेले होते.

आदित्य नारायणचे वडील आणि पार्श्‍वगायक उदित नारायण हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी आणि आदित्यच्या आईनेही नेहाला सून म्हणून स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले गेले होते.

आदित्य आपला एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यासाठी योग्य जोडीदार मिळावा, अशीच आमची अपेक्षा आहे. नेहा आणि आदित्य लग्न करणार असतील, तर आपण सर्वात नशीबवान वरपिता ठरू असेही उदित नारायणनी म्हटले होते. आदित्यने आपल्याशी नेहाबरोबरच्या लग्नाविषयी काहीही चर्चा केलेली नाही, असेही उदितने सांगितले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.