पुणे – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी (आरटीई) राज्यात एकदाच प्रवेशासाठी सोडत अर्थात लॉटरी काढण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले.
त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 1 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी एक महिना मुदत दिली आहे. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आरटीई प्रवेशाच्या वेळापत्रकाची माहिती ट्विट करीत दिली.
त्यानुसार दि.28 डिसेंबरपासून आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. याच तारखेपासून ते 17 जानेवारीपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची पुन्हा तपासणी होईल. प्रवेशासाठी दि. 1 ते 28 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कालावधी आहे. दि. 8 व 9 मार्च रोजी लॉटरी काढली जाईल. लॉटरीद्वारे निवड यादीतील पालकांनी दि. 10 ते 31 मार्चदरम्यान पडताळणी आवश्यक आहे