पारगाव -कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ दौड तालुक्यातील पारगाव येथे शिवाजी मराठा सोसायटीचे ऑनररी सेक्रेटरी सर्जेराव जेधे यांच्या पुढाकाराने प्रतिकात्मक स्वरूपात महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पोपटराव ताकवणे, दौड पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे, मार्केट कमिटीचे संचालक संभाजी ताकवणे, युवा नेते दिग्विजय जेधे,
माजी सरपंच रा. वि. शिशुपाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनूसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, दत्तात्रय अल्हाट, वैभव बोत्रे, रामचंद्र टिळेकर, माऊली शेळके, विशाल घिगे आदी मान्यवर उपस्थित होते.