भारतीय मजदूर संघाचा पीएसयूच्या निर्गुंतवणुकीला तीव्र विरोध

भारतीय मजदूर संघ देशपातळीवर मोहीम राबविणार

नवी दिल्ली – सार्वजनिक उद्योगांची (पीएसयू) आक्रमक निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाने सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. सप्टेंबर महिन्यात या निर्णयाविरोधात देशपातळीवर मोहीम हाती घेण्यात येईल आणि निदर्शने करण्यात येणार आहेत.

निती आयोगाने निर्गुंतवणुकीसाठी एक आराखडा जाहीर केला आहे. त्यात 92 कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आज भारतीय मजदूर संघाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासंदर्भातील समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत सरकारी कंपन्या वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सप्टेंबर 1 ते 7 या कालावधीत देशभर मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरात बैठका, धरणे, आंदोलने करण्यात येणार आहेत.

15 नोव्हेंबर रोजी सरकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्याचे दिल्लीत अधिवेशन घेण्यात येईल. या अधिवेशनात सरकारच्या धोरणाला पर्यायी धोरण सुचविण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीला बीएसएनएल, एमटीएनएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन, एफसीआय आणि इतर कंपन्यांचे सदस्य उपस्थित होते. संघटनांनी तोट्यात असलेल्या सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक न करण्याचा आग्रह केंद्र सरकारला केलेला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)