नगर – दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी 25 वर्षीय युवकास शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी बालिका रोडवरील सिंधू मंगल कार्यालयाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन अमृत हजारे (वय, 25, रा. बोरूडेमळा, महात्मा फुले नगर, नगर) हे सिंधू मंगल कार्यालयजवळ उभे असतांना तेथे महेश दादाभाउु भोर आणि अक्षय माताडे (रा. भुतकरवाडी) हे आले व त्यांनी हजारे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावर हजारे यांनी दोघांना दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येवून दोघांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण केली.
अक्षय माताडे याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. आणि जर पुन्हा जर आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही तर तुला तलवारीने कापून टाकू अशी धमकी दिली. मारहाणीत चेतन हजारे जखमी याप्रकरणी तोफखाणा पोलिसांनी चेतन हजारे यांच्या फिर्यादीवरून भादविक 324, 504, 506 याप्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. ना. जी. डी. चौधरी हे करित आहेत.