बारामती, (प्रतिनिधी)- रोहित पवारांनी बारामतीत लक्ष देण्यापेक्षा स्वत:ची धोक्यात आलेली आमदारकी सांभाळावी, असा टोला भाजप युवा मोर्चाचे पुणे ग्रामीण महामंत्री वैभव सोलनकर यांनी लगावला आहे.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय नेते झाल्याचे भासवत आहेत. त्यातूनच ते बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत.
रोहित पवार यांना आमदार करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १०० टक्के वाटा आहे. त्यामुळे रोहित पवारांनी स्वत:ची आमदारकी सांभाळावी असा उपरोधिक टोला सोलनकर यांनी लगावला आहे.
अजित पवार यांनी ताकद दिल्यामुळे रोहित पवार यांना आमदारकी मिळाली. मात्र, मतदारसंघातील जनतेची कामे करण्यापेक्षा राज्यभर मिरवण्यात वेळ घालवल्यामुळे कर्जत जामखेडच्या जनतेने रोहित पवारांचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवण्याचा चंग बांधला आहे, असाही चिमटा सोलनकर यांनी काढला आहे.