Rohit Pawar on Sangita Wankhede । मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकरयांनी केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काल (दि. २१) अजय महाराज बारसकर यांनी मोठे खुलासे करत जरांगेंवर टीकास्त्र डागले. मनोज जरांगे यांनी मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका अजय महाराज बारसकर यांनी केली. । Rohit Pawar on Sangita Wankhede
दरम्यान, त्याच्या काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना समोरे जावे लागत आहे.
यावेळी बोलताना संगिता वानखेडे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. । Rohit Pawar on Sangita Wankhede
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. त्या कोण आहेत? याचा अभ्यास करावा लागेल. यांचं नाव देखील मी ऐकलेलं नाही. योग्य व्यक्तीने टीका केली तर मी त्यावर बोलतो, असं रोहित पवार म्हणाले.
शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात – संगीता वानखेडे । Rohit Pawar on Sangita Wankhede
संगीता वानखेडे म्हणाल्या की, ‘शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते.
टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.