पिंपरी – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शनिवारी (दि.6) शहराच्या दौर्यावर होते. या दौर्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या खास शैलीत उत्तरेे दिली. सार्वजनिक जीवनात वावरताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर कार्यक्रम टाळत असल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळला. वसंतदादा साखर संस्थेचा मी ट्रस्टी असून, या संस्थेच्या कार्यक्रमात मी त्यांच्यासोबत होतो. मात्र आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये मला वेळ न मिळाल्याने मी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देण्याएवढा तो मोठा नाही. त्याच्या आरोपांना माझ्या पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिकारी उत्तर देतील, असे यावेळी स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठा नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे आदी राजकीय मंडळींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते. एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी न सोडणारे शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने शहराबरोबरच राजजकीय विश्लेषकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते.
दरम्यान, अजित पवार हे दिवसभर शहराच्या दौर्यावर असल्याने, ते नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपल्या दिवसभरातील कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगत, व्हीएसआयच्या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर होत असलेल्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी अजित पवरा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचार असता, त्यांच्या वक्तव्याला उत्तर देण्याएवढा तो मोठा नाही. त्याच्या वक्तव्याबाबत माझ्या पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिकरी उत्तर देती, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.