रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

स्वतः ट्विट करुन दिली माहिती

पुणे – जळगाव जिल्हा बँकेच्या तथा माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः सोशल माध्यमाव्दारे ही माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर  असून त्यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे. तसेच गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाला घाबरायचं नाही. कोरोनाला हरवायचं. काळजी करायची नाही. खबरदारी घ्यायची. तसेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होईन, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या एकनाथ खडसे यांनी  काही दिवसांपूर्वीच भाजपला  रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.