नवी दिल्ली : भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम ‘आदित्य एल-1’ लाँच होण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी याचे प्रक्षेपण होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे हे पहिलेच मिशन असणार आहे. यासाठी ‘आदित्य’ उपग्रहाला अंतराळात नेणारे PSLV रॉकेट लाँच पॅडवर सज्ज झाले आहे. तसेच, या मोहिमेची रंगीत तालीमही यशस्वीपणे पार पडली आहे. त्यातच आता इस्रोच्या शास्त्रज्ञांची एक टीम आदित्य-L1 मिशनच्या मिनी मॉडेलसह तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचली.
भारताचे पहिले सौर मिशन Aditya-L1 हे 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावणार आहे. आदित्य एल-1 च्या लॉन्चिगची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना इस्रो शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांनी, “रॉकेट आणि सॅटेलाईट सज्ज आहे. आम्ही प्रेक्षपणासाठी पूर्ण अभ्यास केलेला आहे.”
#WATCH | Andhra Pradesh: A team of ISRO scientists arrive at Tirumala Sri Venkateswara Temple, with a miniature model of the Aditya-L1 Mission to offer prayers.
India's first solar mission (Aditya-L1 Mission) is scheduled to be launched on September 2 at 11.50am from the… pic.twitter.com/XPvh5q8M7F
— ANI (@ANI) September 1, 2023
आदित्य एल-1 मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोच्या प्रमुखांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, ‘आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून लॉन्च केली जाईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य L-1 या अंतराळयानाला L-1 बिंदूवर घेऊन जाईल. L1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच 15 लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे.
इस्रोचे प्रमुख पुढे बोलताना म्हणाले की, आदित्य एल-1 मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे. प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य-L1 ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा जरा जास्त काळा चालेल.
आदित्य-L1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये समाविष्ट केले जाईल. जिथे L1 पॉईंट आहे. हा पॉईंट सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत तो फक्त 1 टक्के आहे. या प्रवासासाठी 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे अवघड मानलं जातं, कारण त्याला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जावे लागते.