Road Safety World Series : विजेतेपद पटकावल्यानंतर दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केला आनंद

रायपूर – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (Road Safety World Series) मध्ये इंडिया लीजेंड्सने (India Legends) 14 धावांनी श्रीलंका लीजेंड्सचा पराभव केला. त्याचबरोबर इंडिया लीजेंड्सने या विजयाबरोबर पहिलेवहिवले विजेतेपद पटकावले. त्यामुळे इंडिया लीजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर इतर ही खेळाडूंनी पोस्ट शेअर केल्या.

सचिन तेंडूलकर –
सचिन तेंडूलकरने इंस्टाग्रामवर आनंद व्यक्त करताना, आपल्या संघासोबत विजयाचे सेलिब्रेशन करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर म्हणले आहे की, “वॉव… चंद्रावर..!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

विरेंद्र सेहवाग –
विरेंद्र सेहवागनेसुद्दा आपला आनंद व्यक्त करताना ट्विटरवर एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यापैकी दोन फोटो सचिन आणि त्याचे आहेत, तर एक फोटो संपूर्ण संघाचा आहे. तसेच त्यानी लिहले, रोडसेफ्टी वर्ल्डसरीज 2021 खेळणे आणि मित्रांसह पार्कमध्ये वेळ घालवणे आणि स्पर्धा जिंकणे ही मजेदार गोष्ट आहे. संस्मरणीय काही आठवडे.

युवराज सिंग –
युवराज सिंगने अंतिम सामन्यात शानदार फटकेबाजी करताना अर्धशतक लगावले होते. त्यानंतर या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंडिया संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. त्याचबरोबर या सेलिब्रेशनचा एक फोटो युवराजने ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये आपल्या इतर संघ सहकार्यांना टॅग करताना लिहले आहे की, “वेल डन यंगस्टर्स. अभिनंदन.”

त्याचबरोबर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेत पहिल्यावहिले विजेतेपद पटकावल्याने इंडिया लीजेंड्स संघावार सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.