शिक्रापूर – सणसवाडी ते दरेकरवाडी येथील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेला रस्ता अखेर मंजूर झाला आहे. प्रथमच ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान टेक्नोलॉजी वापरून रस्ता बनविण्यात येत असून ग्रामस्थांनी देखील रस्त्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
दरेकरवाडी (ता. शिरूर) येथील मुख्य रस्ता म्हणजे सणसवाडी ते दरेकरवाडी रस्ता गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली असताना या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
प्रथमच ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी वापरून रस्ता बनविण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाची नुकतीच माजी उपसरपंच हिरामण दरेकर, शंकर दरेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल दरेकर, सोसायटी संचालक संदिप दरेकर, दशरथ शेलार, बबलु जवळकर, अरुण दरेकर, योगेश ताठे, संदिप दरेकर, अभिषेक दरेकर, महिला बचत गट अध्यक्ष शारदा दरेकर, रेणुका कोळेकर, कांताबाई दरेकर यांसह आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे.
गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्त्याच्या प्रश्न अखेर मार्गी लागला असून, दरेकरवाडीला चांगला रस्ता मिळणार असल्याने ग्रामस्थांनीदेखील समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रत्येकाने आपलेच काम समजून कामाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी व्यक्त केले.