स्टॉकहोम – फ्रान्सच्या महिला वैज्ञानिक ईमॅन्युएल चार्पेंटिअर आणि अमेरिकेतील जेनीफर ए दाऊदना या दोन महिलांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
पदार्थातील अणू रचना बदलण्याच्या संबंधातील संशोधन त्यांनी केले आहे. त्याचा उपयोग जुने वांशिक रोग अगदी कर्करोगही बरा करण्यासाठी होऊ शकणार आहे. त्यांनी शोधून काढलेल्या या पद्धतीला कॅस 9 असे नाव देण्यात आले असून प्राणी आणि वनस्पतींमधील डीएनए बदलण्याची या संशोधनात क्षमता आहे.
कृषी आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात या संशोधनाचा उपयोग होणार आहे. रसायनशास्त्रातील हे एक मूलभूत संशोधन मानले जात आहे.
आम्हाला मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारामुळे जगाच्या अन्य भागातील नवीन वैज्ञानिकही उत्साहाने संशोधनाच्या क्षेत्रात उतरतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळेल, असा विश्वास चार्पेंटिअर यांनी पुरस्काराच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
नोबेल पुरस्कार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आता साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्रांचे नोबेल पुरस्कार घोषित होणे बाकी आहेत.