मुंबई : बिनधास्त अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या रिचा चढ्ढा नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा रिचा तिच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचा उलगडा करीत असते. नवीन रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या अपडेट ते नव्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चत असते.
यातच, रिचा यावेळी तिच्या हटके फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिचाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या नव्या फोटोशूटचे हटके फोटो शेअर केले आहे. या फोटोत तिचे काजळ भरलेले, नजरेत दाह असलेले डोळे, चेहऱ्यावरील शून्यात नेणारे तरीही काळजाचं पाणी करणारे भाव, असं एकंदर या सौंदर्यवतीचं रुप दिसून येत आहे.
दरम्यान, चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी म्हणून ओळखली जाणारी रिचा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीत आहे. ज्याचीच एक झलक तिने चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. सध्या या फोटोला इंस्टाग्रामवर युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.