भारतीय लष्कराचे “चीता’ हेलिकॉप्टर कोसळले

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमधील रियासी जिल्ह्यात सोमवारी भारतीय लष्कराचे “चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळले. ही दुर्घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.

उधमपूर येथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. ज्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात आहे. या अगोदर सप्टेंबर 2019 मध्ये पूर्व भूतान येथे देखील चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्या वेळी घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार व वैमानिक कॅप्टन कालझॅंग वांगडी यांचा समावेश होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.