मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतच्या हत्येनंतर चर्चेत आली होती. ड्रग्ज प्रकरणात तिला एनसीबीने अटकही केली होती. मात्र महिन्याभरानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तीन वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा काम करण्यास सुरूवात केली आहे. ‘एमटीव्ही रोडीज 19’ या रिॲलिटी शोमधून तिने पुनरागमन केले आहे. या शोमधील तिचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
‘एमटीव्ही रोडीज 19’च्या एका एपिसोडमध्ये गौतम गुलाटीने एका स्पर्धकाला सीबीआयचा फुल फॉर्म विचारला. मात्र त्याला याचा उत्तर सांगता आले नाही. तेवढ्यात रिया चक्रवर्ती हात वर करत म्हणते की “मला माहित आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन.” रियाने दिलेले हे उत्तर ऐकून सगळेच चकित झाले. कारण सुशांतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरी आढळला होता. त्यानंतर रियावर सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. सध्या सुशांतचा निधनाचा तपास सीबीआय करत आहे. त्यामुळे तिचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. मात्र सुशांत 14 जून 2020 रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. सुशांत प्रकरणाचा तपास अनेक तपास यंत्रणांनी केला आहे, मात्र मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचे चाहते आजही त्याला न्याय मिळावा अशी याचना करत आहेत.