पुणे – पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास वकिलांसह न्यायालयीन घटकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवाजीनगर न्यायालय येथील अशोका हॉल येथे झालेल्या या शिबिरात 250 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी स्व:ता रक्तदान केल्यानंतर शिबिरास सुरूवात झाली. त्यानंतर नंबर लावून रक्तदान करण्यात आले. मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे 50 ते 60 लोकांना रक्तदान करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बारकडून पुन्हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतिश मुळीक आणि उपाध्यक्ष ॲड. योगेश तुपे यांनी सांगितले.
यावेळी पुणे बार असोसिएशनच्या खजिनदार ॲड. भाग्यश्री मुळे, हिशेब तपासणीस ॲड.ओंकार चव्हाण, कार्यकारिणी सदस्य ॲड.आकाश मुसळे, ॲड.आनंद धोत्रे आणि ॲड. अमित यादव उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट अथवा जर्किंग भेट देण्यात आली. करोना परिस्थितीत नियमाचे पालन करण्यात आले.