मंचर, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंचर (ता. आंबेगाव) येथे भाजपा नेते संजय थोरात यांनी भेट देऊन बाळांना पोलिओचा डोस दिला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र अवसरी खुर्द अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवण्यात आला.
यावेळी थोरात यांनी भेट दिली व सर्व आशा वर्कर,आरोग्य अधिकार्यांच्या कामाचे कौतुक केले. आरोग्य सहायक एस. एम. गुजकंर, एम. आर. धायगुडे, गीतल गावडे, दत्तात्रय सोनवणे, प्रियांका शेटे, विद्या लोंढे आदी उपस्थित होते.