प्रजासत्ताक दिन : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वतीने शहिद जवान संभाजी राळेंच्या कुंटुंबाला आर्थिक मदत

बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कुरकुंडी गावातील शहिद जवान संभाजी राळे यांच्या कुंटुंबाला 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते शहिद जवान राळे यांच्या दोन्ही बहिणीकडे सुपूर्त करण्यात आज (दि.२६) आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजगुरूनगर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ध्वजारोहणानंतर सुप्रसिद्द व्याख्याते अशोक देशमुख यांनी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी शहिद जवान राळे यांच्या भगिनी नम्रता राळे, अनिता राळे, निवृत्त जवान रमेश राळे, राजगुरूनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष प्रताप आहेर, किरण आहेर, किरण मांजरे, गणेश थिगळे, विजया शिंदे, राजेंद्र सांडभोर, हेमलता टाकळकर, ऍड डी के गोरे, राहुल तांबे पाटील, परेश खांगटे, सागर पाटोळे, सतीश नाईकरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, उपसरव्यपस्थापक संजय ससाणे, अमृत टाकळकर, दिलीप मलघे, अंकुश कोहिणकर, मंजीत महिंदर, बाळासाहेब घोलप, सम्राट सुपेकर यांच्यासह बँकेच्या सर्व शाखांचे शाखा मॅनेजर, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.