Kisan Tractor Rally Updates : एका शेतकऱ्याचा ‘मृत्यू’; आंदोलक शेतकरी आणि पोलिसांत प्रचंड ‘संघर्ष’

Kisan Tractor Rally Updates – नवी दिल्लीतील शेतकरी टॅक्टर रॅलीत हिंसा झाली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेडा फडकवला आहे. तर दुसरीकडे आयकर विभाग कार्यालयाजवळ एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. टॅक्टर पलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. तसेच काही जणांनी दिल्ली पोलीस जवानांवर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर येत आहे.

दिल्ली के ITO चौराहे पर हिंसक किसान

शेतकऱ्यांच्या एका गटाने दावा केला आहे की, मध्य दिल्लीतील आयकर विभाग कार्यालयात शेतकरी आणि पोलीसांच्या झटापटीत पोलीसांनी केलेल्या गोळीबारात उत्तराखंड येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला असून दोन शेतकऱी जाणूनबुजून पोलीसांच्या दिशेने टॅक्टर चालवत असल्याचेही दिसते आहे.

दिल्ली के ITO चौराहे पर हिंसक किसान

आयटीओ विभाग कार्यालयात अश्रूधुराचा वापर –

आयटीओ कार्यालयाजवळ शेतकरी आणि पोलिस कर्मचारी यांच्यात संघर्ष उफाळून आला. जेव्हा शेतकरी लुटियन दिल्ली क्षेत्राकडे जावू लागले, तसेच पोलिसांच्या बसवर हल्ला केला तेंव्हा कारवाईत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच अश्रूधुराचा वापरही करण्यात आला आहे.

दिल्ली के ITO चौराहे पर हिंसक किसान

आयटीओ जवळ झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांनी लाठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच टॅक्टरने पोलिसांच्या वाहनांना टक्कर मारली. शेतकऱ्यांनी नियोजित वेळेआधीच विविध ठिकाणांहून टॅक्टर परेड सुरू केली. परवानगी नसतानाही शेतकरी मध्य दिल्लीतील आयटीओत पोहोचले. पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून गर्दी पांगवण्यात आली आणि आंदोलकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.