वाघोली – तुळापुर फाटा ते आळंदी रस्ता खड्डेमुक्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले यांनी दिला आहे.
याबाबत अमोल शिवले यांनी सांगितले की, तुळापुर फाटा ते आळंदी या रस्ता अत्यंत खराब व खड्ड्यांचा झाला आहे. या रस्त्यावरून चाकण एमआयडीसी मरकळ तसेच फुलगाव एम आयडीसी असल्याने कायम स्वरुपी जड वाहतुक होत असते. अनेक छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून अनेक वर्ष हा रस्ता जास्तीच्या निधीपासून प्रलंबित आहे.
नेहमी या रस्त्यावर फक्त यावर एखादा थर टाकला जातो व तो पुन्हा खराब होतो ही परिस्थिती आहे. ४५ मी. चा प्रस्तावीत रोड असुन सुद्धा अनेक वर्ष रस्ता रुंदीकरण झाले नाही. तो लवकरात लवकर करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमोल शिवले यांनी दिला आहे.
या रस्त्याची पाहणी करून रस्ता तातडीने खड्डेमुक्त करा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. याप्रसंगी माजी चेअरमन राजाराम शिवले, माजी उपसरपंच राहुल राऊत, माजी उपसरपंच संतोष शिवले, चेअरमन रमेश शिवले, ग्रा.पं.सदस्य राजाराम शिवले, माजी चेअरमन पांडुरंग शिवले, भाजपा चे सहकार आघाडीचे उपाध्यक्ष नवनाथ शिवले, माजी व्हाईस चेअरमन शांताराम शिवले, राजेंद्र शिवले, दिलीप शिवले, निलेश शिवले, दादासो शिवले, आदी मान्यवर उपस्थित होते.