मुंबई – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा ( Remo DSouza ) याला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका ( heart attack ) आला. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली होती.
View this post on Instagram
मात्र आता रेमोचा रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. रेमोची पत्नी लिजेलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात रेमो संगीताच्या तालावर पाय थिरकवताना दिसतोय. ‘पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे, तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी आभार,’ असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.
View this post on Instagram
दरम्यानं रेमो अजूनही आयसीयूमध्ये आहे. शुद्धीवर आहे. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. रेमोची पत्नी लिजेल ही कॉस्च्युम डिझायनर आहे. तिला आणि रेमोला दोन मुलं आहेत. रेमो यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात बॉलिवूड कोरिओग्राफर धर्मेश, सलमान, कृति महेश आणि अभिनेता आमिर अली गेले होते.