पुणे – पुण्यातील मनसे फायरब्रँड नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: माध्यमांसमोर ही नाराजी बोलून दाखवली. शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातील कोअर कमिटीच्या नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली. या विषयी त्यांनी स्वतः माध्यमानसमोर आपले मत व्यक्त केले. तसेच, या सर्व अंतगर्त वादांवरून त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती.
त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात येऊन वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी भेट घेतली. काल (शुक्रवारी) झालेल्या बैठकीनंतर अमित ठाकरे हे कोअर कमिटीसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार होते. परंतु, वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना शहर कार्यालयात पाय ठेवणार नाही अशी भूमिका घेतली. ज्या कार्यालयामध्ये माझ्या विरोधात कटकारस्थान झाली त्या कार्यालयात मी का जाऊ? असं त्यांनी म्हंटलं आहे.
मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि
१/२#मनसे pic.twitter.com/qBNH37xjiX— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) December 9, 2022
दरम्यान, हा सगळा वाद झाल्यानंतर घरी गेल्यावर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी जुन्या कार्यक्रमातील बॅनर बाहेर काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर माझं आणि राज ठाकरे यांचं नातं कसं घट्ट आहे, हे ही या व्हिडीओतुन सांगितले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.