बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा जलवा आजही कायम आहे. जसे काय वय त्यांनी आपल्या मुठीत कैद केले आहे.रेखा यांच्या सौन्दर्याचे आणि अभिनयाचे जगभरात दिवाने आहेत.
मात्र, चित्रपटांपेक्षाही त्यांच्या खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या सिंदुरवरही नेहमी प्रश्न उभे केले जातात. परंतु, आजही याचे उत्तर मिळालेले नाही. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या अपूर्ण इच्छाही व्यक्त केल्या.
रेखा यांना समाज नेहमी एकटा मानतो. पण त्या स्वतःला एकटे मानत नाही. एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या, मी स्वतंत्र जीवन जगते. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. परंतु, मला कमीत कमी पाच मुले असावीत, अशी इच्छा होती. मात्र रेखा यांची हि इच्छा अपूर्ण राहिली. यामुळे सध्या त्या एका पाळीव कुत्र्याला जीव लावतात.
रेखा यांच्याकडे पिसी नावचे एका कुत्रे होते. परंतु, ते आता या जगात नाही. यानंतर आणखी एका कुत्र्याला त्यांनी दत्तक घेतले. असे म्हणतात, एकदा लंडनला जाताना विमानात कुत्र्याला परवानगी नाकारण्यात आली. यामुळे रेखा खूप नाराज झाल्या होत्या. रेखा यांनी सेक्रेटरीकडे कुत्र्याला लंडनकडे रवाना झाल्या होत्या.
दरम्यान, रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी पडद्यावर नेहमीच सुपरहिट राहीली. यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप वेळा रंगल्या. जया बच्चन यांनी आपले घर वाचवण्यासाठी
अमिताभ यांच्यासमोर एक अट ठेवली.
यानंतर अमिताभ बच्चन नेहमीच रेखापासून दूर राहिले. यानंतर एका रिऍलिटी शोमध्ये लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेम करणे काय असते हे मला विचारा, असे रेखा मजेत म्हणाल्या होत्या.
अमिताभ यांच्यानंतर रेखा यांच्या आयुष्यात मुकेश अग्रवाल याची एंट्री झाली. या दोघांनी लग्नही केले. परंतु, वैवाहिक जीवनात वाढता तणाव आणि बिझनेसमधील नुकसानीमुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. यानंतरही रेखा यांचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले होते.