नोंदणी बंधनकारक पाळीव प्राण्यांच्या दुकानांचीही

श्‍वान प्रजनन व विपणन केंद्रांनाही द्यावी लागणार माहिती

पिंपरी – पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे अशी दुकाने सुरु करताना कुठल्याही प्रकारच्या परवान्याची आवश्‍यकता नव्हती. त्यामुळे, पाळीव प्राण्यांची बेकायदा विक्री करणारी दुकाने अनेकांनी थाटलेली होती. याला आळा घालण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. पाळीव प्राण्यांच्या विक्रीच्या दुकानाची तसेच श्‍वान प्रजनन व विपनन केंद्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात पाळीव प्राण्यांची विक्री करण्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. विशेषत: शहरी भागात श्‍वान, तसेच इतर पाळीव प्राण्याची विक्रीची दुकाने वाढत चालली आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी आता पाळीव प्राण्यांची दुकाने, श्‍वान प्रजनन केंद्र व विपनन केंद्रांना त्यांची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्‍तालय यांच्याकडे करावी लागणार आहे. जिल्ह्यात प्राण्यांचे व्यवसाय करणाऱ्यांनी “पाळीव प्राणी दुकान नियम-2018′ नुसार आपला अर्ज, नोंदणी शुल्कासह पशुसंवर्धन उपायुक्‍त कार्यालयात सादर करायचा आहे. हे अर्ज उपायुक्‍त कार्यालयातून प्राणी कल्याण मंडळाकडे शिफारसीसह पाठवून त्यांची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या नोंदणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्‍तांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.